। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक दिलाने व जोमाने काम करून प्रीतम म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन शेकापचे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी केले आहे. शेकापक्षाचे उरण विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारकार्यात सुरेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावभेटींवर भर दिला आहे. यावेळी सुरेश पाटील यांनी सांगीतले की, शेतकरी कामगार पक्षाचे काम जनतेच्या हृदयात आहे. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा जडणघडणीने तयार झालेला आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी शेकापक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा एक दिलाने आणि जोमाने कामाला लागला असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.