। रायगड । खास प्रतिनिधी ।
भारत निवडणूक आयोगाने 32 रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (सर्व साधारण), निवडणूक निरीक्षक (पोलीस) आणि निवडणूक निरीक्षक (खर्च) यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निवडणूक निरीक्षक संपूर्ण निवडणूक कालावधीत शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे पूर्वनियोजित भेटीसाठी दुपारी बारा ते एक या वेळेत उपलब्ध असणार आहेत.
संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) असून त्यांचा संपर्क क्रमांक-9699976811 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपेंद्र दीक्षित आहेत. जिल्ह्यातील निवडणूक संबंधित सर्वसाधारण बाबी पाहणार आहेत. जोयस लालरेम्मवी निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांचा संपर्क क्रमांक-9022742240 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अजित गोळे आहेत. जिल्ह्यातील निवडणूक संबंधित कायदा व सुव्यवस्था विषयक बाबी ते पाहणार आहेत.
खर्च निरीक्षक म्हणून धिरेंद्रमणी त्रिपाठी यांचा संपर्क क्रमांक-9373364532 आहे. सहायक संचालक लोकल फंड प्रवीण वडगाये त्यांचे संपर्क अधिकारी आहे. ते निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. ही सर्व माहिती नागरिक व मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.