| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात सुमारे 48 वर्षांची परंपरा असलेल्या लायन्स क्लब रोहाच्या अध्यक्ष पदी अब्बास रोहावाला यांची निवड झाली आहे. यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे- झोन चेअरपर्सन- नुरूद्दीन रोहावाला,उपाध्यक्ष सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, सेक्रेटरी डॉ कृष्णा जरग, सहसेक्रेटरी अर्चना कटिरा, खजिनदार- पराग फुकणे, सहखजिनदार वर्षा सातपुते, संचालक प्रदीप दामाणी, रविंद्र घरत, शिरिष सातपुते, प्रमोद जैन, मीलन शहा, प्रद्युत कुळकर्णी, लक्ष्मण शिट्याळकर, डॉ रूपेश होडबे, डॉ रोहित क्षीरसागर, अॅड हेमंत गांगल, प्रभातसिंह गिरासे,मितेष कटिरा,समृद्धी राणे, इल्याझ डबीर, तौसिफ येरूणकर, सैफी रोहावाला, जयदेव पवार, भावेश दामाणी, रशिदा रोहावाला यांची निवड करण्यात आली.अलेफिया रोहावाला व जुमाना रोहावाला यांनी सुंदर सूत्रसंचालन केले तर डॉ कृष्णा जरग यांनी आभार मानले.