श्रीवर्धनच्या अध्यक्षपदी आशिष गंद्रेंची निवड

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
कोकणस्थ नामदेव ज्ञाती संघ, दिवेआगर-श्रीवर्धन आयोजित श्रीसंत नामदेवांचा 672 वा समाधी सोहळा यावर्षी श्रीवर्धन नारायण पाखाडी येथील सोनाली सतिश गंद्रे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. यानिमित्ताने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार, मनोरंजन कार्यक्रम, नवीन अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये आशिष गद्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी योगेश गंद्रे, सचिव अवधूत डोळस, कोषाध्यक्ष नितीन पतंगे, सल्लागार अतुल गंद्रे, सहसल्लागार सोनाली गंद्रे तसेच सदस्यपदी दीपाली हेंद्रे ,वैशाली पतंगे, अर्चना गंद्रे, भारती पतंगे, सोनाली गंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version