गुरुजींची उद्या सत्वपरीक्षा; विप च्या पाच जागांची निवडणूक

सर्वच मतदार संघात चुरस
| मुंबई | प्रतिनिधी |
विधानपरिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी ( 30 जानेवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाचही मतदार संघातील मतदार असलेल्या गुरुजी आणि प्राध्यापकांची सत्वपरीक्षा होणार आहे.पुढील सहा वर्षासाठी आपले नेतृत्व कुणाच्या हाती सोपवायचे याचा घेतला जाणार आहे.2 फेब्रुवारीला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक, औरंगाबाद शिक्षक, नाशिक पदवीधर अशा पाच मतदारसंघात सोमवारी निवडणूक होत आहे. या पाचही मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीने एकजुटीने लढविण्याचा निर्धार केला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील (शेकाप), अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज (काँग्रेस), नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडबाले (काँग्रेस), औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळे (राष्ट्रवादी), आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील (शिवसेना), या महाविकास आघाडीचे उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित आहेत.

या पाचही उमेदवारांना महाविकास आघाडीतील शिवसेना ( ठाकरे),राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेससह शेकापने पाठिंबा दिला आहे. या सवार्ंच्या विजयाकरिता शेका पक्षाचे तसेच शिक्षक, पदवीधर, विद्यार्थी, युवक अशा सर्व आघाड्याांवरील कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी.
आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय त्यानी सांगितले आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version