। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील जसखार गावाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर यांची रयत शिक्षण संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर निवड झाली आहे. शालेय जीवनापासून अतिशय हुशार असलेल्या ठाकूर यांनी शालेय शिक्षण उरण तालुक्यातील फुंडे येथे पूर्ण करून उच्च शिक्षण आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल येथे पूर्ण केले.
फुंडे कॉलेज वर तासिका तत्त्वावर अतिशय कमी मानधनावर प्रथम रुजू झाले. विद्यार्थ्यांना त्यांचे शिकवणे खुप आवडतं होते. त्यांची प्रतिभा पाहूनच प्राचार्य एच आर मढवी सर यांनी त्यांची नियुक्ती पनवेल कॉलेज वर कायम स्वरुपी केली. त्यानंतर त्यांनी मागे पहिलेच नाही.
एक्झिक्युटिव्ह कमिटीवर गणेश ठाकूर यांची निवड
