उरणमधील शेतकर्यांचा निर्धार
| उरण | वार्ताहर |
उरणमध्ये एमएमआरडीए भूसंपादनास विरोध करण्यासाठी उरण पूर्व भागातील शेतकर्यांची बैठक पानदिवे येथे संपन्न झाली. उरण तालुक्यातील 29 महसुली गावे, पनवेल तुक्यातील 7 महसुली गावे व पेण तालुक्यातील 88 गावांचा समावेश आहे. याअगोदर उरण, पनवेल, पेणमध्ये आलेले सेझचे संकट दूर करून इथल्या शेतकर्यांनी इतिहास घडवलेला आहे, यावेळी समन्वयक रुपेश पाटील यांनी प्रास्ताविकात एमएमआरडीला विरोध करण्याचे व जमिनी देणार नसल्याचे सुतवाच केले. यावेळी शेतकर्यांनी आपली मते मांडून ठाम विरोध दर्शवला आहे.
येथील आगरी, कोळी, कराडी, बहुजन समाजाच्या जमिनी लाटण्याचे काम शासनामार्फत सुरू असून, या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा असल्याचे दिसते आहे. विकासक या नात्याने या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन येथील समाजाला उद्ध्वस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातली शासन निर्णय निवडणूक आधी प्रसिद्ध झाला होता. एमएमआरडीला विरोध करण्यासाठी पाणदिवे येथील बैठकीत एमएमआरडीला जमीन देणार नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले.
या बैठकीसाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, अॅड. मेघनाथ पाटील, अॅड. डी.के. पाटील, हिरामण पाटील, महेंद्र ठाकूर, डॉ. सुभाष घरत, अॅड. शेखर पाटील, मनोज पाटील, संतोष ठाकूर, ए.डी. पाटील, अॅड. सत्यवान भगत, चंद्रशेखर पाटील, अॅड. नवाले, सुनील वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये संघर्ष कमिटीवर काम करण्यासाठी संचालकांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच यामधून संघर्ष कमिटी स्थापित करून हा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.