इंडियन प्रेस क्लबच्या पदाधिकार्‍यांची निवड जाहिर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शाहजहाँन अत्तार यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील पदाधिकार्‍यांची निवड जाहीर केली असून, निवड झालेल्या सर्व पत्रकारांना 6 जानेवारी पत्रकार दिनी निवडपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्षपदी राजू पोतदार पुणे, सदस्यपदी प्राजक्ता किणे, प्रदेश उपाध्यक्षपदी किरण बाथम, रामचंद्र पोर्रे, जगदीश राजे, ए. बी. गायकवाडे, दिलीप माने, सादिक खाटीक, गणेश कुंबळे, प्रदेश सचिवपदी शाहिद खेरटकर, शामभाऊ जांभोळीकर्र, प्रसाद कुलकर्णी, जनरल सेक्रेटरीपदी भारत मगर, प्रदेश सदस्यपदी मकरंद भागवत, हनुमंत देसाई, भारत कवीराज, साबिया शेख यांची निवड जाहीर करण्यात आली.
तर, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी सादीक शेख, कोकण विभाग अध्यक्षपदी बाबासाहेब ढोले, उपाध्यक्षपदी रमजान गोलंदाज, सरचिटणीसपदी प्रविण कोलापटे, खजिनदारपदी रविंद्र कोकाट, सदस्यपदी शरद पोरे यांची निवड जाहीर करण्यात आली.
तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश जाधव, रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेश बाष्टे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय सावंत, पनवेल अध्यक्षपदी बाळकृष्ण कासार, कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विनोद नाझरे, सांगली जिल्हाध्यक्षपदी शब्बीर मुजावर, मुंबई विभाग अध्यक्षपदी मुबारक शेख गोरगाव, मुलुंड विभागातून वसिम अन्सारी, हरबरलाईन क्षेत्राध्यक्षपदी अरुण कौशिक याबरोबरच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्षपदी इम्रान कोतवाल यांची निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्दुल शेख यांनी प्रस्तावनते युनीटी, जस्टीस आणि राईट्स या तीन तत्वांवर अधारीत असलेल्या संघटनेचे उद्दीष्ट आणि ध्येय विशद केले. तर, राष्ट्रीय अध्यक्ष विवेक म्हमाणे पाटील यांनी संघटनेच्या पर्यायाने पत्रकारांच्या हितासाठी आज ठोस काम करण्याची गरज असून क्षणिक विचार न करता भविष्याचा विचार करुन संघटनेची कार्यपद्धती असेल, असे स्पष्ट केले.

Exit mobile version