अध्यक्षपदी मंदार पाटील यांची निवड

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे अध्यक्ष निलेश पाटील यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नव्याने अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी मंदार पाटील, तर उपाध्यक्षपदी स्वाती म्हात्रे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून दिव्या पाटील, अस्मिता पाटील, निलेश पाटील, संजीवनी कोळी, नीता कोळी, गणेश नागोरकर, महेंद्र जोशी, प्रसिद्धी कासकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच कीर्तिनीधी ठाकूर, उपसरपंच अभिजीत पाटील, माजी उपसरपंच प्रफुल्ल पाटील, माजी सरपंच अविनाश पाटील, अलंकार ठाकूर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील आदींसह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version