। पेण | वार्ताहर ।
पेण तालुक्यातील पाटणोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मानसी नरेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाटणोली ग्रामपंचायतीचा सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये मानसी नरेंद्र पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी निनाद पाध्ये यांनी मानसी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊ ऐरणकर, माजी सभापती परशुराम पाटील, लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष पाटील, निळकंठ म्हात्रे, माजी सरपंच सुधाकर पाटील, नरेंद्र पाटील(भाई), नकुल कोळी, माजी सरपंच सारिका पाटील, माजी सरपंच नंदा म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सुर्यकांत पाटील, विलास म्हात्रे, विकास पाटील, उपसरपंच सुरज पाटील, माजी उपसरपंच मंगेश पाटील, माजी उपसरपंच संजय म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई भोईर, प्रकाश वाघमारे, नलिनी वाघमारे, उद्योजक निलेश पाटील, माजी पोलीस पाटील भालचंद्र पाटील, खरोशी सरपंच चंद्रकांत घरत, पांडुरंग पाटील, विकी ठाकुर, यांच्या सह मोठया प्रमाणात पाटणोली ग्रामस्थ हजर होते.