माणगाव सभापतींची निवडणूक बिनविरोध

| माणगाव । वार्ताहर।
माणगाव नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत पाणी पुरवठा,सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापतीपदी कपिल गायकवाड, स्वच्छता,आरोग्य क्रीडा समिती सभापतीपदी दिनेश रातवडकर तर महिला,बालकल्याण व युवक कल्याण समिती सभापतीपदी नंदिनी बामगुडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीचे पीठासन अधिकारी म्हणून माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी तर मदतनीस म्हणून माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी काम पहिले.

Exit mobile version