पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्षाची उद्या निवड

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक 10 फेब्रुवारीला दुपारी होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस आघाडीच्या उमेदवार आशा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज बुधवारी मागे घेतला असून चोळईतील व्हाईट हाऊसमध्ये शिवसेना आणि काँग्रेसचे नेते एका कारखान्याच्या विस्तारीकरणासंदर्भात एकाच व्यासपिठावर आजच येणार असल्याने महाआघाडीच्या सत्तास्थापनेची ही नांदी मानली जात आहे. पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसतर्फे आशा सचिन गायकवाड आणि शिवसेनेतर्फे सोनल प्रकाश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आशा गायकवाड यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गुरूवारी ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version