पुणे विद्यार्थी गृहाच्या चेअरमनपदी राजेंद्र बोर्‍हाडे यांची निवड

| नेरुळ | वार्ताहर |

पुणे विद्यार्थी गृह या 114 वर्ष जुन्या नामांकित शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या चेअरमनपदी मुंबई शाखेचे माजी विद्यार्थी राजेंद्र बोर्‍हाडे यांची पुढील पाच वर्षासाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील कानसे या गावचे सुपुत्र असलेले बोर्‍हाडे यांनी मुंबई येथील संस्थेच्या विद्याभवन वसतीगृहात राहून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विद्याभवन घाटकोपर येथे आपली नोकरी करत असतानाच संस्थेने 2009 मध्ये संचालकपदी निवड केली. त्यांनी 2016 ते 2021 पर्यंत पाच वर्षांसाठी कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. संस्थेप्रती उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ही निवड सार्थ अभिमानाची आहे, असे मत माजी कार्याध्यक्ष प्राचार्य कृ. ना. शिरकांडे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version