अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा राजेश घरत यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदी रेश्मा राजेश घरत यांची निवड जाहीर होताच शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.







