अध्यक्षपदी सरस्वती चौधरींची निवड

| कर्जत | प्रतिनिधी |

इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्या नवीन 2024-25 वर्षाकारिता पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी क्लबच्या अध्यक्षपदी सरस्वती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉयल कॅम्प येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इनरव्हील डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ. शोभना पालेकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये इनरव्हील क्लब कर्जत मधील कार्यकारणी कार्यरत झाली. यावेळी नवनिर्वाचित कार्यकारणीच्या अध्यक्षा म्हणून सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष वनिता सोनी, सचिव कश्यापी ठक्कर, कोषाध्यक्ष शिल्पा दगडे, आईएसओ ज्योत्स्ना शिंदे, संपादक मोनिका बेडकर, सीसी मनीषा साबणे, सल्लागार समिती प्राची चौडीये, उत्तर वैद्य, सुलोचना गायकवाड, करुणा पराडकर, सदस्या उज्वला पाटील, रूपा खणाल, साक्षी अडसुळे, शीतल पाटील, वैशाली मुसळे यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version