। नागोठणे । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकार्यांचा निवड मेळावा पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेझारी येथे नुकताच पार पडला. या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणीसह रोहा तालुक्यातील पदाधिकार्यांची निवड करण्यात आली असून शेकाप नागोठणे शहरासह विभागातील कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
शेकापच्या रायगड जिल्हा चिटणीस मंडळामध्ये नागोठण्यातील तुकाराम खांडेकर (गुरुजी) यांची तर रायगड जिल्हा महिला आघाडी सदस्य म्हणून कांचन माळी (आंबेघर) यांची निवड करण्यात आली आहे. रोहा शहर चिटणीस सदस्य म्हणून राजू तेलंगे (बाळसई) व गणपत डाकी (शेतपळस) यांची निवड करण्यात आली आहे. विभागीय चिटणीसपदी प्रवीण जांबेकर (आमडोशी) यांची, तर महिला आघाडी सदस्यपदी सुनीता माळी (निडी) व समीक्षा यादव (नागोठणे) यांची निवड करण्यात आली आहे. पुरोगामी युवक संघटना सदस्यपदी अरुण चोगले (नागोठणे), कामगार आघाडी सदस्यपदी दीपक माळी (आंबेघर), अल्पसंख्यांक आघाडी उपाध्यक्ष म्हणून नाझीम सय्यद (नागोठणे), तर मच्छीमार आघाडी सदस्यपदी सुधीर पारंगे यांची निवड करण्यात आली आहे. शेकापचा नागोठणे विभागातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.