। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीमधील नोंदणीकृत पथविक्रेता समितीकडून 8 सदस्यांच्या निवडणूकीचे आरक्षण व कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. ही निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार होती. पथविक्रेत्यांकडुन याची जारेदार तयारीदेखील सुरू होती. परंतु, ही निवडणूक स्थगित केल्याने पथविक्रेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पथविक्रेते अरविंद गायकर यांनी सांगितले की, पथविक्रेते सदस्यांची निवडणूकीचे कार्यक्रम जाहीर झाले. परंतु, ही निवडणूक मुरुड-जंजिरा नगरपरिषदे तर्फे पहिल्यांदाच होत असल्याने या निवडणूक संदर्भात राजकीय पक्षांना माहित नाही. ही निवडणूक कशी असणार, शहरात नोंदणीकृत पथविक्रेते कीती आहेत, कोण कोणाला मतदान करणार, या निवडणुकीत येणार्या सदस्यांचे काम का असणार, या समितीमुळे पथविक्रेताचा कसा फायदा होणार, याची माहिती प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार यांच्याकडून घेण्यात आली होती. आणि यानंतरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पुर्णतः तयारी केली होती. शहरातील 255 नोंदणीकृत पथविक्रेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार तोच अचानक प्रशासकीय कारणास्तव ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे पत्र मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयाकडून प्राप्त झाले. यामुळे पथविक्रेत्यांमध्ये अरविंद गायकर यांनी सांगितले.