ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद: खरगे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद झाली आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शुक्रवारी (दि. 29) दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणामधील पराभवावर विचारमंथन करण्यात आलं.

खरगे म्हणाले की, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे त्याबद्दल जितके कमी बोलले तितके चांगले. मात्र देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी कितपत पार पाडली जात आहे, यावर वारंवार प्रश्‍न उपस्थित होत आहे.

खरगे म्हणाले, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागलेल्या प्रकारानंतर विधानसभेचा निकाल राजकीय पंडितांच्याही समजण्यापलीकडचा आहे. असे परिणाम समोर आले आहेत की, कोणतेही त्याचे समर्थन करू शकत नाही.

खरगे म्हणाले की, गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपण हरलो असलो तरी यामुळे हे वास्तव बदल नाही की, जनता त्रस्त आहे. बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता हे आपल्या देशाचे ज्वलंत प्रश्‍न आहेत. जात जनगणना हादेखील आज महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यघटना, सामाजिक न्याय आणि समरसता हे लोकांचे प्रश्‍न आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्रश्‍न आहेत. राज्यांच्या निवडणुकांच्या वेळी स्थानिक समस्याही लक्षात ठेवाव्या लागतील.

Exit mobile version