अलिबाग तालुक्यातील ‘या’ सहा ग्रामपंचायतींची होणार निवडणूक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या सुमारे 7649 ग्रामपंचायतीच्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

यात अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये आक्षी, बोरीस, नारंगी, मुळे, वैजाळी व शिरवली या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच 20 डिसेंबरला मतदारांनी कोणाला कौल दिला हे निश्‍चित होणार आहे.

Exit mobile version