नवी मुंबई | प्रतिनिधी |
महावितरण आणि ब्युरो ऑफ एनर्जी एफिसीएन्सीच्या (बीईई) संयुक्त विद्यमाने मंगळवारी (14 डिसेंबर ) सकाळी 10 वाजता भव्य इलेक्ट्रिक व्हेईकलचा रोड शो ङ्गगो इलेक्ट्रिकफ कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक . विजय सिंघल यांच्या हस्ते या रोड शोचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रोड शो ची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या रोड शो मध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, एम जी मोटर, कोना, हिरो, अथेर, इट्रीओ, डेल्टा, बी गौस या कंपन्यांची विजेवर चालणारी वाहने सहभागी होणार आहेत. वाशी रेल्वे स्टेशनपासून इलेक्ट्रिक व्हेईकल रॅलीला प्रारंभ होणार असून वाशी सेक्टर 17 मार्गे शिवाजी चौक (वाशी बस डेपो), सेक्टर 9, हॉटेल ब्लु डायमंड, पाम बीच गेलेरिया मॉल, अरेंजा कॉर्नर, एपीएमसी माफको, सानपाडा स्टेशन मार्गे परत वाशी स्टेशनलगत तुंगा हॉटेल समोर रॅलीचा समारोप होणार आहे.