। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल शहरात महावितरणच्या बहुतांश डीपी धोकादायक बनल्या आहेत. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या उघड्या डीपीकडे महावितरण सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नवीन पनवेल सेक्टर 14 मधील सिकेटी शाळेच्या समोरील बाजू धोकादायक डीपी असून येथे मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी उभे असतात. तसेच या डीपी शेजारी आमराई तसेच सिडकोचे गार्डन आहे. या गार्डनमध्ये मुले खेळण्यासाठी येत असतात. यामुळे येथे एखाद्यी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. तरी पावसाळापूर्वी ही कामे करावीत असे येथील नागरीकांनी मागणी केली आहे.