श्रीवर्धन शहरात विजेचा गोंधळ

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरात उष्णतेनी उच्चांक गाठलेला असतांना महावितरणाकडून होत असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित प्रकाराने नागरिक त्रस्त झालेले असुन काही तांत्रिक बिघाड झाल्यास वीज पुरवठा पुर्ववत होण्यास दोन तास लागतात. वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केले की काय? अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
कोरोनाचे निर्बंध उठल्यापासून शहरात पर्यटन वाढले आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये इनर्व्हटर, जनरेटर ह्या सुविधा असल्यातरी काही तास वीजपुरवठा खंडित झाला कि ह्या सुविधा अपुर्‍या पडतात. महिन्यातून दोन ते तीन दिवस देखभाल व दुरुस्ती करिता सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा खंडित केला जातो. तरीही शहरातील वीज समस्या कायम आहे. अधूनमधून खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे हॉटेल, लॉज यांचे नुकसान होतेच पण झेरॉक्स, वेल्डींग उद्योग, आइस्क्रीम पार्लर या व्यवसायीकांचे काही प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

काही वेळेला वीज चमकल्यावर इंन्सुलेटर निकामी होतो. हा पार्ट निकामी झाला की पार्ट बदलण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यातच वादळी वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनींना लागतात व विद्युत पुरवठा काही वेळासाठी खंडित होतो. खंडित वीजपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी आमचे कर्मचारी कार्यरत असतात.
महेंद्र वाकपैंजन, उपकार्यकारी अभियंता, श्रीवर्धन.

Exit mobile version