विजेचा प्रश्‍न निकाली

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील पटेल मोहल्ला, कुंभारवाडा परिसरातील विद्युत पुरवठा साधारण 10 ते 15 तासांच्या वर खंडित झाला होता. याबाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तत्परतेने हा प्रश्‍न निकाली काढला आहे. तातडीने त्यांनी विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रश्‍नाबाबत विचारले असता, विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या क्रेनची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ राजू सोनी यांनी स्वखर्चाने के्रन भाड्याने घेत वीज वितरण कंपनीच्या ताब्यात दिली व त्यानंतर सदर प्रश्‍न क्रेनच्या सहाय्याने निकाली काढून विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

Exit mobile version