। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील मनिष मार्केट ते बापटा वाडा परिसर काही तासांकरिता विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांसह पत्रकार गणेश कोळी यांनी राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून या असुविधेबाबत माहिती देताच तत्परतेने वीजवितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या साथीने अथक प्रयत्न करून या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला. राजू सोनी यांनी तत्परतेने धाव घेऊन मदतीचा हात दिल्याबद्दल परिसरातील रहिवासी, व्यापारी व नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.