कशेळे परिसरात विजेचा खेळखंडोबा; स्थानिक आक्रमक

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले कशेळे परिसर सध्या वीज समस्येने परेशान झाले आहे. तालुका आदिवासी आणि ग्रामीण भाग यांचा बनलेला तालुका असून या ठिकाणी नेहमी वीज पुरवठा खादीत होण्याची संशय निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक आणि रहिवासी संतापात झाले आहेत. कशेळे आणि परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. या भागातील तसेच कशेळे बाजारपेठेमधील लाईट दिवस भरातून 20 वेळा ये-जा करत असते. लाईट वारंवार जात असल्याने अनेकांचे नुकसान होत आहे. यावर त्वरित दखल घ्यावी अन्यथा कशेळे व्यापारी सामाजिक संघटनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येणार आहे.गेल्या महिन्यात व्यापारी, सामाजिक विकास संघटना यांनी सततच्या लाईट जाण्याच्या समस्या विषय महावितरण कंपनीने कर्जत ऑफिसला निवेदन दिले होते; पण या निवेदनाची महावितरण कंपनीकडून कुठलीच दखल घेतली नाही. छोटे मोठे व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. त्यांचे अर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. यावर लवकर उपाययोज करावी नाहीतर तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असे निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version