श्रीवर्धन तालुक्यात वीज वसुली मोहीम

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
तालुक्यात वीज वसुली मोहीम म्हणजेच थकीत वीज देयकांचे वसुली अभियान सुरू करण्यात आले असून याअंतर्गत बोर्लीपंचयतन या विभागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यान्वये एकूण 517 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीवर्धन उपविभागातील वीज ग्राहकांच्या वीज देयकांची एकूण थकबाकी 58 लाख इतकी आहे. यासाठी या मोहिमेचा अबलंब करण्यात आला असून सप्ताह काळातील दर रविवारी या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय कार्यकारी अधिकारी महेंद्र वाघपैठण यांनी दिली आहे.

Exit mobile version