| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील शिवभक्त व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या सुनील ठाकूर यांनी आवरे गावातील स्मशानभूमीत स्वखर्चाने, दोन हाय पावर 50 वॅटचे हॅलोजन लॅम्प बसवून स्मशानभूमीत, रात्री पडणार्या अंधाराची गैरसोय दूर केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आवरे गावातील स्मशानभूमीत विजेची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील नागरिकांना अंधाराच्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही विजेची गैरसोय लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील ठाकूर यांनी येथील स्मशानभूमीत विजेची व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर स्मशानभूमीत स्वखर्चाने दोन हॅलोजन लावून विजेची सोय केली आहे. त्यामुळे आता येथील स्मशानभूमी प्रकाशमान झाली असून, सुनील ठाकूर यांच्या नावाची चर्चा आवरे गावातून होत आहे. त्यांच्या या अनोख्या कार्याबद्दल आवरे ग्रामस्थांनी व इयत्ता सातवीच्या बॅचच्यावतीने त्यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.