। पनवेल । वार्ताहर ।
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरु असलेल्या सर्वेक्षणात पालिका हद्दीत 25 हत्तीरोगाचे रुग्ण असल्याचे निष्पण झाले आहे. तसेच, ग्रामीण पनवेलमध्ये 27 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवीन पनवेल परिसरामध्ये तीन आणि नावडे गावात एक असे चार रुग्ण पालिका क्षेत्रात नव्याने बाधित झाल्याची नोंद आहे. महापालिकेने सध्या घरोघरी आरोग्य सेवकांच्यामार्फत सर्वेक्षण करुन हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही शोधमोहीम राबविली आहे. 13 लाखांवर पनवेल तालुक्याची लोकसंख्या आहे. त्यापैकी महापालिका क्षेत्रात 10 लाख लोकसंख्या आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रोहिंजन, पेणधर या गावांसह पनवेल शहर कोळीवाडा आणि तळोजा पाचनंदनगर परिसरात सर्वाधिक हत्तीपाय रोगावर उपचार घेत असलेले रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहेत.





