खोपोली नगरपालिका कार्यालयाची लिफ्ट बंद

| खोपोली | प्रतिनिधी |

नगरपारिषद कार्यालयाची दोन्हीही लिफ्ट गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शासकीय कामासाठी येणाऱ्या अबालवृध्द, महिला तसेच नागरिकांना पाच मजले चढताना दमछाक होत आहे. कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी लिफ्ट लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

खोपोली नगरपरिषदेची पाच मजली नवी इमारत शहराच्या बाहेर उभारली आहे. शासकीय कामासाठी किंवा समस्याचा पाढा वाचण्यासाठी नागरिकांना रिक्षाने किंवा पायी चालत येतात. नगरपरिषदेची पाच मजल्यावर विविध विभागाचे कार्यालय असल्यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी दोन लिफ्टची सुविधा आहे. कामानिमित्त येणाऱ्या लोकांची एकाच फेरीत कामे होत नाहीत. त्यामुळे दररोज कार्यालयाची खेटे मारवे लागत असल्याने दररोज पाच मजले चढताना दमछाक होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी लिफ्ट लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Exit mobile version