। श्रीवर्धन । वार्ताहर ।
अगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात ज्ञानदेव मारुती पवार (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशनपत्र काढून घेतल्यामुळे पुढील 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात अनिल द.नवगणे (राष्ट्रवादी: शरदचंद्र पवार), आदिती सुनिल तटकरे (राष्ट्रवादी), अश्विनी उत्तम साळवी (ब.स.पा., फैजल अब्दुल अजीज पोपेरे (मनसे), अनंत बा.गिते (अपक्ष), कृष्णा बा.कोबनाक (अपक्ष), मोहम्मद कासिम बु.सोलकर (अपक्ष), युवराज भुजबळ (अपक्ष), राजाभाऊ ठाकूर (अपक्ष), संतोष तानाजी पवार (अपक्ष), अशरफखान दादाखान पठाण (अपक्ष) हे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. जरी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यातच होणार आहे.