| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जून महिन्यात घेण्यात आलेल्या चाचणी पंच परिक्षेमध्ये रायगड जिल्ह्यातील अकरा पंच 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून मुख्य परिक्षेस पात्र ठरले आहेत. ही बाब जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय आनंददायी आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील पंचासाठी 105 दिवसांचे मार्गदर्शन शिबिर (ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यशाळा) जून 2026 पासून सूरू करण्यात आली आहे. सदर शिबीर 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या शिबिरात मुख्य प्रशिक्षक व क्रिकेट नियमांचे तज्ञ नयन कट्टा यांच्या सह बीसीसीआयचे दोन पंच हर्षद रावले व रुपेश खडगी तसेच एमसीए मुंबईचे पंच राजन कसबे हे पंचाना मार्गदर्शन करत आहेत. आरडीसीएचे सदस्य तथा एमसीएचे पंच ॲड.पंकज पंडित व प्रशांत माळी यांना शिबीराच्या आयोजनाची जबाबदारी दिली आहे. उत्तीर्ण झालेल्या पंचाची नावे पुढील प्रमाणे. अरुण ठाकूर (उरण), राहुल पाटील (उरण), रविंद्र म्हात्रे (उरण), ॲड. देवेंद्र मिश्रा, श्रीकांत पाटील (पेण), संकेश ढोले, मंगेश वार्डे (अलिबाग), सूरज देशमुख (रोहा), प्रवीण देशमुख (खालापूर), प्रणव सामंत, यश संकपाल (पनवेल) उत्तीर्ण झालेल्या सर्व पंचांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण
