अकरा वाहने जळून खाक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। नाशिक । प्रतिनिधी ।

पेठ रोड परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची कार्यशाळा असून कार्यशाळेच्या मोकळ्या जागेत आरटीओ कारवाई करण्यात आलेली वाहने लावली जातात. रविवारी (दि. 20) दुपारी कार्यशाळेच्या आवारात गवतात उभ्या असलेल्या वाहनांच्या ठिकाणी धूर निघू लागला आणि काही वेळात या ठिकाणांवरील झाडाचा पाचोळा पेटल्याने वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यात नऊ रिक्षा, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक स्विफ्ट डिझायर अशी अकरा वाहने जळून खाक झाली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन पाण्याच्या बंबाच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.

Exit mobile version