अनेक घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी
| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकच्या जुने नाशिक भागात दुचाकी वाहन खरेदी-विक्री गोदाम आणि घरांना आग लागली. या आगीत 70 पेक्षा अधिक दुचाक्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या दहा बंबांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
नाशिकच्या जुने नाशिक भागात चौक मंडल इथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. या भागात असलेल्या दुचाकी वाहन खरेदी विक्रीच्या गोदामाला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात रशीद खान यांच्या मालकीच्या गोदामामधील सत्तरहून अधिक दुचाक्या पूर्णहतः जळून खाक झाल्या. यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले आणि गोदामाच्या मागच्या बाजूस असलेली तीनघरेयात जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी यात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.







