राज्य सरकारला धक्का | | | | मुंबई | प्रतिनिधी | इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.
अकरावीची सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश, मुंबई
- Tags: cetcet cancelhigh courtjunior collegemarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Related Content
खंडणी प्रकरण भोवले! भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी विरुद्ध गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
August 3, 2026
जाज्वल इतिहास पुढे नेणार - ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
August 2, 2026
संघर्षाशिवाय पर्याय नाही- चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
August 2, 2026
ईव्हीएमविरोधात युवक आंदोलन छेडणार- आ. रोहित पवार
by
Sanika Mhatre
August 2, 2026
आजही जनतेचा पक्षावर विश्वास: सुरेश खैरे
by
Sanika Mhatre
August 2, 2026
शेकाप वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचे उद्घाटन
by
Sanika Mhatre
August 2, 2026