सांगोल्यात शेकापचा एल्गार

प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा यशस्वी
। कोळा (सांगोला)। वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढत जोरात शक्तीप्रदर्शन केले. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाचे सुरुवात करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशा, हलगीचा कडकडाट कडकडाट जल्लोषात सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकापचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांना खांद्यावर ती घेऊन अक्षरशः नाचत होते. यावेळी मोर्चात तालुक्यातील शेतकरी हजारो संख्येने उपस्थित झाले होते. मोर्चा चालू असताना डॉ. बाबासाहेब देशमुख डॉ. अनिकेत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत वंदन केले व शहरातील अंबिका मातेला दंडवत घालत दर्शन घेतले. तहसील कार्यालयासमोर सभास्थानी दाखल होताच स्व. आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस व आत्महत्याग्रस्त शेतकरी सूरज जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले.

शेकापचे ज्येष्ठ नेते मा. बाबासाहेब करांडे यांनी प्रस्ताविक केले. त्याच बरोबर पक्षातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करत प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान शेकापचे एक शिष्टमंडळ तहसीलदारांना जाऊन भेटले व जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही म्हणून विचारविनियम करून शेकापचे दुसरे शिष्टमंडळ तहसीलदारांच्या भेटीस गेले यावेळीही चर्चा निष्फळ झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते मोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणे धरल्यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी बाबासाहेबांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 20 तारखेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे ठरले. तोपर्यंत शेतकर्‍यांना वीज बिल भरण्याचे मुदत वाढून मिळालेली आहे. त्यानंतर मात्र ज्यांनी वीज बिल भरलेले नाही अशांची वीज कनेक्शन कट केले जातील असे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते मा. चंद्रकांत दादा देशमुख, बाबासाहेब करांडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, मा. दादासाहेब बाबर, एड बनकर, एड. मारुती ढाळे, उपसरपंच महादेव मामा मा. सरपंच मारुती ढाळे, मा. सरपंच दौलतराव कांबळे, युवा नेते संजय पाटील, मा. हरिभाऊ शेठ येडगे, मा. योगेश आटपडकर जगदिश कुलकर्णी इ. नेते व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version