| माणगाव | प्रतिनिधी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति निमित्त घेण्यात येणार्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या रायगड विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सरस्वती विद्यालय वडघर मुद्रे विद्यालयात अत्यंत उत्साहाने संपन्न झाली. आंबेडकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन प्रतीवर्षी संस्था स्तरावर केले जाते. विविधांगी विषयावर आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी अत्यंत उत्साहाने अभ्यासपूर्ण तयारी करून सदर स्पर्धेत सहभागी होतात.
यावर्षी इयत्ता आठवी साठी कवयित्री शांता शेळके यांची मला आवडलेली कथा , इयत्ता नववीसाठी जीवन गाण्याच्या कवयित्री शांता शेळके, दहावी साठी कवयित्री शांता शेळके यांचे साहित्यातील योगदानहे विषय होते. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे, मनोज सुतार,अमोल तोडकर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे प्रास्ताविक विट्ठल पवार यांनी केले, सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश भेदाटे यांनी केले.
इयत्ता आठवी ते दहावी इयत्तासाठी असलेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिक्षक राजेश नथुराम शिंदे व अनिल वैजनाथ नाचपल्लै यांनी केले. सदर स्पर्धेत इयत्ता आठवीतून माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची श्रेया मरवडे प्रथम,नववीतून माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची कस्तुरी अरुण देवकर प्रथम, दहावितून सरस्वती विद्यामंदिर वडघर विद्यालयाची भूमी धुमाळ यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.अंतिम फेरीसाठी प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी संस्था पातळीवर सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख व शिक्षकांनी नियोजन केले.या स्पर्धेसाठी उपस्थित परीक्षकानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक व सहभागी स्पर्धकांचे मूख्याध्यापक संस्था पदाधिकारी, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.