| रसायनी | प्रतिनिधी |
मुंबईतील चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीतून रसायनी-पाताळगंगा येथील हायटेक इंटरनॅशनल कंपनीत पोहोचविण्यासाठी दिलेल्या बेस ऑईल कच्च्या मालाचा परस्पर अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित ट्रान्सपोर्ट चालकाला रसायनी पोलिसांनी अटक केली आहे. बीपीसीएल चेंबूर कंपनीतून हायटेक इंटरनॅशनल कंपनी, चावणे, पाताळगंगा, रसायनी येथे पोहोचविण्यासाठी एकूण 8 लाख 23 हजार 880 रुपये किमतीचा बेस ऑईल कच्चा माल जय अंबे ट्रान्सपोर्ट, गव्हाणपाडा, चेंबूर येथील चालकाकडे विश्वासाने सोपविण्यात आला होता. मात्र, चालकाने हा माल नियोजित ठिकाणी पोहोचविण्याऐवजी अन्यत्र उतरवून किंवा स्वतःच्या फायद्यासाठी इतर कोणाला विक्री करून त्याचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याते गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला 30 ऑक्टोबर रोजी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोळेकर करीत आहेत.
इंटरनॅशनल कंपनीत मालाचा अपहार
