। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ रेवू चव्हाण (69) रा. दापिवली, वावेघर हा बीपीसीएल कंपनीमध्ये काम करीत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यामुळे त्याला मार लागल्यामुळे त्याला तात्काळ एमजीएम रूग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.







