। पुणे । बारामती ।
पुण्यावरून हैदराबादला निघालेल्या भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचं खांडज गावातील एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअर फोर्सचे मचेतकफ हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँड करण्यात आले असून यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दुरुस्ती झाल्यानंतर हेलिकॉप्टर सोलापूरकडे रवाना होणार असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.यामघ्ये तीन पुरुष तर एक महिला होती. इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर कोणालाही कसलीही इजा झाली नाही. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.