नगरपंचायतीकडून लाकडांची पूर्तता
| सुधागड पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत अंदाजे 15 हजार ते 16 हजार लोकवस्तीचे पाली शहर असून येथील स्मशानभूमीत ही सरणासाठी लाकुड नाहीत अशी परिस्थिती. एखादी व्यक्ती मयत झाली तर मृतांच्या नातेवाईकांना लाकडासाठी वणवण करावी लागत असे. या गंभीर समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर यांनी या गंभीर समस्यांचा पाठपुरावा केले होते. त्यांच्या या पाठपुराला यश आले असून पाली नगरपंचायतीने पाली स्मशानभूमी लाकडे उपलब्ध केली आहे. त्यामुळेमृतांच्या नातेवाईकांना लाकडासाठी वणवण थांबल्याने पाली ग्रामस्थांकडून सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर,पाली नगरपंचायत तसेच नगरसेवक यांचे सर्व स्तरातून अभार व्यक्त केले जात आहे.
मी या गंभीर समस्या बाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. पालीमध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झालं सारणासाठी लाकडे मिळत नाही. वर्तमानपत्रांनी देखील या गंभीर समस्येच्या बातम्या खंबीरपणे लावून धरली. त्यामुळे नगरपंचायतीला यांची दखल घ्यावी लागली. बातम्यांचाच परिणाम म्हणून आज लाकडांची सोय ही पालीकरांसाठी उपलब्ध केली आहे. त्याबद्दल पाली नगरपंचायतीचे सर्व नगरसेवकांचे मी आभार व्यक्त करतो.
प्रकाश पालकर
सामाजिक कार्यकर्ते