| तळा | वार्ताहर |
राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा तहसिल कार्यालय माणगांव येथे महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांची माहिती सांगून लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. 3 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालय माणगांव येथे सकाळी नऊ वाजल्यापासून विविध योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यांत आला आहे. या महामेळाव्यामध्ये माणगांव उपविभागातील माणगांव व तळा येथील नागरीकांना राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यांत येवून पात्र नागरीकांचे अर्ज दाखल करुन घेण्यांत येणार आहेत. तरी, तळा तालुक्यातील नागरीकांनी या संधीचा व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तळा तहसिलदार ए. एम. कनशेट्टी यांचेकडून करण्यांत येत आहे.