| खोपोली | वार्ताहर |
चावणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदासाठी अमोल सुरेश कोंडभर यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक 1 संदीप वाघमारे, गणपत घुटे, मनीषा निरगुडे, तर वार्ड क्रमांक 2 मधून प्रांजली पाटील, रामी वाघमारे, आणि वार्ड क्रमांक 3 रमेश चव्हाण सखु वाघमारे यांनी आज शक्तिप्रदर्शन आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी माजी सरपंच गणपत चव्हाण, नारायण पाटील, विठू भवूड, राजू डफाळ, जयंता भवूड, राम साळुंखे, रघुनाथ जाधव, कोंडू कंधारे, मारुती डफाळ, राम पाटील, जेष्ठ कार्यकर्ते उमाजी नादुस्कर, लक्ष्मण बुधलेकर, सखाराम घुटे माजी सरपंच मनीषा निरगुडे, हिरु घुटे, माजी उपसरपंच गणेश चव्हाण, पोलीस पाटील समीर पाटील, हरिभाऊ कोंडभर, प्रकाश कोंडभर दत्ता दळवी, सुरेश नांदूष्कर तातू साळुंखे, आदींसह चावनी, गारमाळ, साकुचीवाडी, गारमाळ येथील कार्यकर्ते, आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.