। नेरळ । प्रतिनिधी ।
आपत्तीच्या काळात कोणावरही आपत्तीला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नेरळ येथील करिअर टेक्निकल इन्स्टिटयूटच्या माध्यमातून परिसरातील 100 तरुणांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. त्याचवेळी आपत्ती काळात मदत व्हावी म्हणून निहारिया फाऊंडेशनकडून सेफ्टी किट भेट देण्यात आले.
नेरळ-कशेळे राज्यमार्गावर करिअर टेक्निक इन्स्टियुट असून या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्र प्रशिक्षण दिले जाते. सध्या निहारिका फाऊंडेशनकडून करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संस्था चालविली जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील तरुणांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण करणार्या 100 तरूणांना प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम संस्थेच्या आवरत करण्यात आला.त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, संतोष कांबरी, गणेश भोपी, अविनाश डायरे, आतिष आगिवले, रंजना भोपी, गणेश भोपी आदी मान्यवर उपस्थित होते.