स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडू घडतील – कृष्णा म्हात्रे

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
श्री हनुमान मित्र मंडळ तेलवडे आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने आयोजित करुन उदयोन्मुख खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धेतून निश्‍चितच उदयोन्मुख खेळाडू घडतील, असे प्रतिपादन तेलवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा म्हात्रे यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या स्पर्धेचा शुभारंभ मुरुड शहरातील सावली लॉजचे मालक विशु रणदिवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन तेलवडे गावचे उपाध्यक्ष काशिनाथ तांबडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रमोद तांबडकर, समाजसेवक कृष्णा म्हात्रे, काशिनाथ तांबडकर, महादेव म्हात्रे, दिपेश म्हात्रे, केशव भोपी, किरण म्हात्रे, हरिश्‍चंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत मुरुड शहरासह पंचक्रोशीतील 24 संघांनी सहभाग नोंदविला आहे.प्रथम क्रमांक 21,111 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 11,111 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅटमन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सीरिज यांनाही आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

Exit mobile version