डॉ. अनिल पाटील यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दुबई येथे झालेल्या ‘Rising of Global India: -spiration, Possibilities and Challenges’ या विषयावर झालेल्या आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या जे.एस. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांना Eminent Researcher award हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या परिषदेत एकूण 70 प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुबई येथील राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक व दुबई चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ.मुस्ताफा सासा यांचे हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.

यावेळी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. संजय दुधे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. अनिल पाटील यांनी या परिषदेत रायगड जिल्ह्यातील औषधी वनस्पती या विषयावर शोधनिबंध सादर केला. जे.एस. एम. कॉलेजमधील वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका, डॉ. मिनल पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील अळंबी या विषयावर आपला शोध निबंध सादर केला.

समारोपाच्या कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. कावळे, प्राचार्य डॉ.जी.के.चेलियन हे उपस्थित होते. वजह फाऊंडेशन, नागपूर यांचे तर्फे देण्यात आलेला हा पुरस्कार डॉ. कावळे यांचे हस्ते डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अनिल पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा, डॉ.साक्षी पाटील, इतर पदाधिकारी, प्राध्यापक आदींनी अभिनंदन केले.

Exit mobile version