| रेवदंडा/ अलिबाग/ प्रतिनिधी ।
जनता मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांना ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल व सामाजिक योगदानाबद्दल तसेच कोव्हिड काळात केलेल्या आरोग्यविषयक योगदानाबद्दल सोमवारी भारत शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. जनता शिक्षण मंडळाच्या डॉ. साक्षी पाटील यांच्या समवेत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. राम शंकर कठेरीया, प्रा.के.एस.राणा, डॉ.जालिंदर सिंह शन्टी, हरीपाल रावत, मिखाईल गॉर्शाव्ह, अॅड. राकेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यासाठी जनता शिक्षण मंडळाच्या ज्येष्ठ संचालिका शैला पाटील, प्रा. डॉ. अनिल पाटील, प्रा. जयेश म्हात्रे, डॉ.मिनल डॉ.सोनाली पाटील, डॉ. सिमंतीनी ठाकूर, प्रा. निलम म्हात्रे, आर्य पाटील, अनन्या पाटील हे उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गौरव पाटील, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, प्रशांत नाईक, अॅड. सचिन जोशी, संचालक मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.