| रसायनी | प्रतिनिधी |
शाळा सुटली, आयुष्याची वाट बदलली; पण गुरुंचे संस्कार आणि आठवणी मनातून कधीच सुटल्या नाहीत. याच भावनेतून सरनौबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथील सन 1994-95च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी चौक विभागातील वावर्ले येथील तुषार फार्महाऊसवर आयोजित केलेला माजी शिक्षक सन्मान व स्नेहमेळावा अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडला. यावेळी इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंत ज्यांनी या विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, त्या अरुणा शहासने, रसिका अंबावणे, संगीता साखरे, ए.आर. पाटील, देवानंद कांबळे, पी.एस. पाटील, सुरेश वाघमोडे, वाली कुंभार, आप्पासाहेब पवार, राजाराम नलावडे, गणपत पडारी आणि शरद घोघरे यांचा सन्मान करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात सचिन कालेकर, सचित भालेकर, तुषार येवले, शरद सोनवळकर, विष्णू मांडे, नंदू माळी, प्रभाकर काठावळे, राकेश बळी, चंदर धनगर, रोहिदास कुंभार, किशोर मांडे, हरिश्चंद्र पार्ठे, राकेश धनराज, दत्ता मालुसरे, विकास कांबळे, लता खंडागळे, वृषाली कदम, साधना म्हात्रे, योगिता मोरे, लता बागडे, रजनी बाविस्कर, लीला माळी, मनीषा झेमसे, शांती जितेकर, कविता साखरे., लीना सखारे, आशा कुंभार,वर्षा, भक्ती ठाकरे आणि अजय झिंगे यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.







