सम्राट अशोका विजयादशमी उत्साहात

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती तसेच तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.12) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सम्राट अशोका विजयादशमी तथा धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला.

प्रथमतः तळा शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रायगड जिल्हा दक्षिणचे माजी सरंक्षण उपाध्यक्ष आयु. आनंद माळी, समता फोर्सचे सैनिक, डिव्हिजनल ऑफिसर, सहाय्यक शिक्षक आयु. प्रशांत माळी, अंकुश माळी, विशाखाताई कासारे, समता सैनिक दलाचे महिला व पुरुष एकूण 26 जवान व उपस्थित उपासक, उपासिका यांच्या वतीने महामानवाला मानवंदना देण्यात आली. यावेळी तळा तालुका माजी अध्यक्ष भीमराज जाधव, प्रकाश गायकवाड, केशव लोखंडे व उपस्थित शेकडो भिम अनुयायी यांनी सामुदायिक वंदना, त्रिसरण, पंचशील सुत्रपठण पठण केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा व रायगड दक्षिणचे माजी अध्यक्ष आयु. विजय जाधव हे होते. यावेळी मनोहर गायकवाड, सारिका नाक्ते, साक्षी गायकवाड, अशोक पवार, किरण जाधव, गीता जाधव, प्राध्यापक भवरे, प्राध्यापिका भवरे, अ‍ॅड. किरण अडखळे, धनंजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version