| पनवेल | वार्ताहर |
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास अभियान यशस्वी करण्यासाठी पनवेल तहसीलकडून विविध शिबिरे घेण्यात येत आहेत. या योजनांमुळे पनवेल परिसरातील आदिवासी कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली असून तहसील विभागाकडून ही नवीन वर्षाची भेटच असल्याची भावना आदिवासींमध्ये आहे.
पनवेल तहसिल कार्यक्षेत्रात सध्या शिबिरांमधून आदिवासी बांधवांना आधारकार्ड काढणे, जन धन बँक खाते उघडून त्याला आधारकार्ड लिंक करणे, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान निधी, जातीचे प्रमाणपत्र काढणे, घरकुल योजना, हर घर जल योजना तसेच वीज जोडणी इत्यादी सारख्या प्रमुख योजनांची सविस्तर माहिती तसेच लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. याच अनुषंगाने नुकतीच पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या विविध शिबिरांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, महसुल नायब तहसीलदार राजश्री जोगी, निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांची उपस्थिती होती. यावेळी पनवेल तालुक्यातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन करण्यात आले.
विजय पाटील,तहसीलदार, पनवेल
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास अभियान यशस्वी करण्याकरिता पनवेल तहसीलच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरांमधून शासनाच्या प्रमुख योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
