। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये रायगड जिल्हा परिषद कर्मचार्यांचा संवाद मेळावा शुक्रवारी (दि.21) आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्यासह वेगवेगळ्या विभागातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांनी कर्मचार्यांशी संवाद साधत योजनेबाबत मार्गदर्शन केले.
एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्यांचा एनपीएस यूपीएस आर.एन.पी.एस. ही योजना लागू केली आहे. या योजनेचा विकल्प शासन निर्णयाप्रमाणे 31 मार्च 2025 पर्यंत देणे आवश्यक होता. योजनेबाबत कर्मचारी वर्गामध्ये संभ्रम असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा रायगड यांनी संवाद मेळावा आयोजित केला होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्यासह प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा कोषागार अधिकारी टोंगे, खाते प्रमुख व मुख्य वक्ता म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम आदी अधिकार्यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष पराग खोत, सचिव संतोष साळकर, खजिनदार मेघा म्हात्रे यांनी नियोजन केले.